crime

शिरूर! उसाच्या गरम रसात जाऊन पडला अन् पुढे फेकले नदीत…

क्राईम

शिरूर : दारू पिऊन कामावर आलेल्या मजुराचे त्याच्या दोन सहकाऱ्यांसोबत भांडण झाले, यावेळी झालेल्या झटापटीमध्ये हा मजूर तोल जाऊन गुऱ्हाळातील उसाच्या गरम रसात पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला रसाच्या बाहेर काढल्यानंतर दवाखान्यात घेऊन जातो असे सांगण्यात आले, मात्र त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी नदीत फेकून त्याची हत्या करण्यात आली. मांडवगण फराटा येथे असलेल्या एका गुऱ्हाळात हा धक्कादायक प्रकरणार घडला आहे.

या प्रकरणात गुऱ्हाळ मालकाने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरजू असे हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे तर शेरसिंग ओमबीर कुमार आणि करण अनिल ठाकूर (मूळ गाव शीतलगढी, जिल्हा शामली उत्तरप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे ही घटना घडली आहे.

मांडवगण फराटा येथे फिर्यादीचे गुऱ्हाळ आहे. या गुऱ्हाळावर हे मजूर काम करत होते. त्यातील एक मजूर सरजू हा 29 सप्टेंबरला रविवारी पहाटे दारू पिऊन कामाच्या ठिकाणी आला. त्यानंतर त्याचा शेरसिंग ओमबीर कुमार आणि करण अनिल ठाकूर यांच्यासोबत वाद झाला. झटापटीत तोल जाऊन सरजू हा गुऱ्हाळाच्या कढईत पडला. या घटनेत जखमी झालेल्या सरजूला रुग्णालयात घेऊन जातो, असे आरोपींनी सांगितले. मात्र, त्याला रुग्णालयात न नेता भीमा नदी पात्रात फेकून दिऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणी गुऱ्हाळ मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शिरूर शहरातील खून प्रकरणातील फरार आरोपीस सापळा रचून केले जेरबंद…

शिरूर! रात्री लई माज आला होता काय? कार्यक्रम करतो, असे म्हणाला अन् पुढे…

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत माजी सरपंचावर आठ जणांचा तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या