क्राईम

शिरूर तालुक्यात मुलाच्या निधनाने वडिलांची नैराश्यातून आत्महत्या…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे लोणीकंद येथील बापुराव साळवे यांनी मुलाच्या निधनानंतर नैराश्यातून कोरेगाव भीमा येथील पुलावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. याबाबत त्यांची पत्नी सुमन साळवे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

सुमन साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बापुराव साळवे यांना पहिल्या पत्नी पासून राहुल साळवे नावाचा मुलगा होता. तो त्याच्या मामाचे घरी राहत होता. २५/१०/२०२३ रोजी त्याचा मृत्यू झाला होता. बापुराव यांना दारूचे व्यसन होते. त्यांचा मुलगा राहुल हा बुधवारी (ता. २५) मयत झाल्यामुळे पती यांनी मला मी मुलगा मेल्यामुळे आत्महत्या करणार आहे असे म्हणून घरातून सकाळी ०६/०० वा निघुन गेले होते.

बापुराव बेलाजी साळवे (वय ५०, रा. लोणीकंद ता. हवेली) यांनी कोरेगाव भीमा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भीमा नदीच्या पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांना स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे अॅम्बुलन्सने पाठविले होते. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल श्री. मोरे करत आहेत.

शिरुर-रामलिंग रस्त्यावर दुचाकीला धडक; महाविद्यालयीन युवती ठार….

शिरूर तालुक्यात मुलीच्या अंगावरील गोधडी ओढून केला विनयभंग…

शिरुर तालुक्यात एका युवकाची पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांसोबत वादावादी अन नंतर फाशी घेत आत्महत्या

शिरुर तालुक्यात एका युवकाची पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांसोबत वादावादी अन नंतर फाशी घेत आत्महत्या

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

15 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago