siddhi-gawade

शिरुर-रामलिंग रस्त्यावर दुचाकीला धडक; महाविद्यालयीन युवती ठार….

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर ग्रामीण हद्दीत रामलिंग रोडवर मल्हार पार्क जवळ हायवा गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकीत दुचाकीवरील महाविद्यालयीन युवती ठार झाली आहे. सिध्दी चंद्रकांत गावडे (वय १७ रा. टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सिद्धीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिध्दी ही तिच्या वडिलांच्या मोटार सायकल वरून जात असताना पाठीमागून ट्रकने धडक दिली त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्दी ही टाकळी हाजी येथे राहणारी होती. शिरूर शहरातील ज्ञानगंगा विश्वविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकायला होती. आज (बुधवार) सकाळी नेहमीप्रमाणे ती कॉलेजसाठी वडिलांसोबत मोटारसायकलवरून कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. शिरुर शहरा जवळील रामलिंग जवळ मल्हार पार्क समोर पाठीमागून आलेल्या ट्रक नंबर एम . एच . १४ ई. एम. ८५०५ ने मोटार सायकलला जोरात धडक दिली. यावेळी सिध्दी दुचाकीवरुन खाली पडून गंभीर जखमी होवून मरण पावली. यात तीचे वडील चंद्रकांत गावडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. यासंदर्भात बाबाजी गावडे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. ट्रकचालका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक स्नेहल चरापले करीत आहेत.

कॉलेज मध्ये शिकणारी सिध्दी गावडे हि मुलगी गुणी व हुशार मुलगी होती. अचानक पणे काळाने घाला घातल्याने गावडे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शिरुर परिसरात बेकायदेशीर मुरुम उत्खनन करुन या मोट्या ट्रक व हायवा गाड्या बेकारदीपणे चालवत यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिला नसून यांच्या मागे राजकिय पाठबळ असल्याने सर्व शासकिय यंत्रणा मॅनेज करुन अशा अपघातांना जबाबदार होतात. मात्र, यात एखाद्या निष्पापाचा बळी जातो.

शिरूर तालुक्यात चोरटयांनी केली मंदिरातच चोरी…

शिरूर तालुक्यात मुलीच्या अंगावरील गोधडी ओढून केला विनयभंग…

शिरुर तालुक्यात जुन्या भांडणाच्या रागापायी एका महिलेने दुसऱ्या महिलेवर केला ऍसिड हल्ला…

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!