शिरूर तालुका

शिरूर-पाबळ रस्त्यावरील पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पाबळ रस्त्यावरील अण्णापूर ते आमदाबाद फाटा (माशेरेवस्ती) नजीकच्या ओढ्यावरील पुलाच्या डांबरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. पुलावर खडीचे ढिग अस्ताव्यस्त पसरले असल्याने येथे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरील उडणा-या धुळीमुळे वाहनचालक, पादचारी त्रस्त झाले आहेत. पुलावर पडलेल्या खड्डयांमुळे व अस्ताव्यस्त पसरलेल्या खडीमुळे ग्रामस्थांबरोबर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शिरूर – पाबळ रस्ता पुढे मलठण (ता.शिरूर) येथे अष्टविनायक महामार्गाला जोडला जात असल्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. वाहतूकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यावरील आमदाबाद फाटा जवळील माशेरेवस्ती नजीकच्या ओढ्यावरील पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. गेल्या काही महिन्यापासून पुलावरील डांबरीकरणाचे काम रखडले असून, पुलावर खड्डे पडले आहे. खडी अस्ताव्यस्त पसरली आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, वाहनचालक अनेकदा घसरून पडून छोटेमोठे अपघात घडत आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, तत्काळ पुलावरील डांबरीकरणाचे काम मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.

‘अण्णापूर ते आमदाबाद फाटा (माशेरेवस्ती) नजीकच्या ओढ्यावरील पुलाच्या डांबरीकरणाचे काम पावसाळ्यात होऊ शकले नाही. आता याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना सुचना देऊन तत्काळ काम पूर्ण केले जाईल.’
– अनिल जाधव, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरूर

‘माशेरेवस्ती येथील पुलावर खड्डे पडल्याने व खडी अस्ताव्यस्त पसरल्याने वारंवार अपघात घडत आहेत. धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. दररोज प्रवास करणे मुश्किल झाले आहे.’
– आशिष जगताप, वाहनचालक

शिरुर-रामलिंग रस्त्यावर दुचाकीला धडक; महाविद्यालयीन युवती ठार….

शिरुर तालुक्यात रस्ता दुरुस्तीसाठी तरुणांचे अनोखे आंदोलन, सहकाऱ्यांसह घेणार थेट जलसमाधी…?

न्हावरा फाटा ते चौफुला रस्त्यावर रस्ता रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल

शिक्रापूर पाबळ रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago