क्राईम

शिरूर तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजा राहिला अर्धवट उघडा अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील सुभाष भिकोबा कदम या व्यक्तीला रात्रीच्या वेळी दरवाजा अर्धवट उघडा ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. चोरटयाने घरात प्रवेश करून घरामध्ये देव्हाऱ्याच्या खाली असलेल्या लाकडी कप्यात ठेवलेले साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे १ लाख ,७८ हजार रूपये किमंतीचे दागिने चोरुन नेले आहे.

शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष भिकोबा कदम (वय ७०) यांच्या घरी गुरुवारी (ता. ८) रात्री १२.०० ते शुक्रवारी (ता. ९) पहाटे ०५.०० वा. च्या दरम्यान चोरट्याने घराचा अर्धवट उघडा असलेल्या दरवाज्यामधून प्रवेश केला. घरामध्ये देव्हाऱ्याच्या खाली असलेल्या लाकडी कप्यात ठेवलेला एकूण १,७८,००० /- रूपये किंमतीचा ऐवज त्यामध्ये ९५ हजार रु किमंतीचे १९ ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण, १५ हजार रु किमंतीचे ३ ग्रॅमचे गळयातील डोर्ले, ५ ग्रॅम वजणाची पिळयाची २५ हजार रु किमंतीची अंगठी, १५ हजार रु किमंतीची ३ग्रॅम वजना ची लेडीज अंगठी, १५ हजार रु किमंतीचे ३ ग्रॅम गळयातील मणी, साडेसात हजार रु किमंतीचे दीड ग्रॅम गळयातील डोर्ले, अडीच हजार रु किमंतीची अर्धा ग्रॅम नाकातील चमकी , ३ हजार रु . किमंतीचा चांदीचा पायातील जोडवी जोड असा ऐवज चोरट्याने चोरुन नेला आहे.

दरम्यान, याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.

मांडवगण फराटा येथे टेम्पो व दुचाकीच्या धडकेत पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू…

शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्‍याला केले ठार…

कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?

शिरुर; ट्रक मालक-चालकाने केला आठ लाख रुपयाच्या कांदयाचा अपहार; गुन्हा दाखल

चिंताजनक! शिरूर तालुक्यातून महिनाभरात मुलीसह महिलाही बेपत्ता…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

19 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

19 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

19 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

19 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

19 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

19 तास ago