Shirur Police Station

चिंताजनक! शिरूर तालुक्यातून महिनाभरात मुलीसह महिलाही बेपत्ता…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर मध्ये एका महिन्यात ५ मिसींगच्या केसेस दाखल झाल्या आहेत. शिरूर शहर व परिसरात अल्पवयीन मुलीसह महिलाही बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे.

घटना १:
शिरूर शहरातील सोनार आळी येथून प्रतिक्षा वैभव शहाने (वय २०) ही युवती २३ जुलै पासून बेपत्ता झाली आहे.

घटना 2:
शिरूर शहरातील बागवान नगर येथील अल्पवयीन मुलगी इन्स्टाग्राम वर अनोळखी व्यक्तीबरोबर चॅटींग करत असल्याने आई रागावल्याने ती २० जुलैला घर सोडून निघून गेली आहे.

घटना ३ आणि ४:
रामलिंग (ता. शिरुर) येथुन सुमन सखाराम साळवे (वय ४४) व त्यांचा मुलगा जिवन सखाराम साळवे (वय १८) हे दोघेही (ता. ३) ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघुन गेले आहे.

घटना ५:
आता मनिषा राजेंद्र शुक्ला (वय ३५, रा. शिक्रापूर) ही महिला शिरूर येथील भाजी मार्केट येथुन कोणास काही एक न सांगता निघुन गेली आहे. ती अद्याप पर्यंत घरी आले नाही. खबर देणार यांनी तिचा शिरूर परीसर व नातेवाईक यांचेकडे शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही.

मिसींग व्यक्तीचे नाव व वर्णन…
नावः मनिषा राजेंद्र शुक्ला (वय. ३५ वर्षे ) रा. शिक्रापुर ता. शिरूर जि. पुणे, रंग काळे सावळे, चेहरा उभट, केस काळे लांबसडक, उंची ५ फुट, अंगात लाल रंगाच पंजाबी ड्रेस, पायात चप्पल, कानामध्ये सोन्याची रिंग, गळ्यात सोन्याचे मंगळसुत्र, पायामध्ये पैजन व जोडवे, कपाळावरती लाल रंगाची टिकली
एकुणच शिरूर शहर व परिसरात अल्पवयीन मुलीसह महीलाही बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्यातून मिसींगच्या घटना घडू लागल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरुर येथुन अचानक आई व मुलगा बेपत्ता, पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची तक्रार दाखल; पतीचे गंभीर आरोप

शिरूर तालुका! मैत्रिणीकडे जाणून येते असे सांगून गेलेली मुलगी घरी परतलीच नाही…

शिरूर तालुक्यात अनोळखी व्यक्तीसोबत अल्पवयीन मुलगी करत होती चॅटिंग…

शिरूर! तुला खुप माज आला आहे का, तुझ्या टंगड्‌याच काढतो…

शिरूर तालुक्यात महिलेला शिविगाळ करून केला विनयभंग…