shirur-hut-fire
शिरूर (अरुणकुमार मोटे): भूमिहीन असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी मोलमजुरीचे काम करणारी पत्नी संसाराचा गाडा हाकत असताना घरगुती व प्रापंचिक कारणावरून रागाचे भरात नवऱ्याने स्वतःचची झोपडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. १४) रात्री टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे घडल्याने जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत उषा संतोष पवार (वय २७) यांनी शिरूर पोलिसांत पती संतोष वसंत पवार याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील बोटा येथील रहिवासी असलेले पवार कुटुंब उदरनिर्वाहासाठी टाकळी हाजी येथील शिनगरवाडी जवळ राहत आहे. सायंकाळी जेवण करत असताना उषा हिने माझ्या सोबत मजुरीच्या कामाला चला असे म्हटल्याचा राग पती संतोषला आल्याने त्याने स्वतःचीच झोपडी पेटवून दिली.
आगीमध्ये घरातील सर्व साहित्याची झाली राखरांगोळी…
झोपडी पेटल्यानंतर शेजाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. शेतकऱ्यांनी याबाबत माजी सरपंच दामूशेठ घोडे यांना कळविताच ते तत्काळ पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिस आल्याची चाहुल लागतच संतोष तेथून पसार झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक कारंडे करीत आहेत.
दरम्यान, पतीला दारूचे व्यसन असल्याने वारंवार त्रास देत आहे. आज ना उद्या सुधारेल या आशेवर आजवर आवाज उठविला नाही. स्वतःच्या कष्टाने मुलीचे लग्न केले असून मुलगा आश्रमशाळेत शिकत आहे. दररोज मीच कामाला जायचे, संतोष हा मात्र फक्त दारु पिऊन घरी गोंधळ घालत असतो. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून मला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिसांत तक्रार द्यावी लागली, असे उषा पवार यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील त्या भागात एकाच रात्री पाच शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी
शिरुर; माझ्या मुलाचा एवढा काय गुन्हा होता…? त्यांनी एवढं निर्दयीपणे त्याला का मारलं…?
सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्रीधर तांबे यांचे निधन
रांजणगाव MIDC पोलिसांनी उसतोड मजुर पत्नीचा खुन करुर फरार झालेल्या आरोपीस केली अटक
शिरुर तालुक्यात कंटेनर इलेक्ट्रिक पोलला धडकून कंटेनर मधील २१ लाखाचे पार्सल जळून खाक…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…