क्राईम

शिरूर तालुक्यात मित्रानेच मित्राला घातला लाखो रुपयांचा गंडा…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): कासारी (ता. शिरुर) येथील एकाने आपल्या मित्राला कंपनीमध्ये व्यवसाय करुन देतो असे म्हणून तब्बल दहा लाख एक्कावन हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे निलेश तुकाराम नेवसे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासारी येथील निलेश नेवसे हा युवक चाकण येथील एका कंपनीत कामाला असल्याने त्याने गावातील महेश भुजबळ या मित्राला विश्वासात घेत त्याला मी काम करत असलेल्या कंपनीमध्ये वेगवेगळे साहित्य तू पूरव तुला पैसे भेटतील असे सांगून निलेश याने महेशला विश्वासात घेतले. मी सर्व काही करतो, असे सांगून कंपनीच्या एका फॉर्मवर सह्या घेतल्या, त्यांनतर कंपनीच्या मेल आयडी वरून महेशला वेगवेगळ्या वस्तूंची पर्चेस यादी पाठवून त्यासाठी लागणारे पैसे मागवून घेतले. चार महिन्यात दहा लाख एक्कावन हजार रुपये वेगवेगळ्या मटेरियल साठी पाठवून देखील चार महिने गेले तरी महेशला कंपनीकडून काही रक्कम मिळाली नसल्याने त्याने निलेशकडे विचारपूस केली.

दरम्यान, महेश भुजबळ यांनी कंपनीमध्ये जाऊन चौकशी केली असता कंपनीनेच निलेश नेवसे याच्यावर फसवणूक केल्याबाबत पोलिसांत तक्रार केल्याचे समोर आले. त्यावेळी महेश यांनी कंपनीच्या मेलवरून आलेल्या पर्चेस ऑर्डरबाबत चौकशी केली असता निलेश याने बनावट ऑर्डर पाठवलेली असून कंपनीकडे यांच्याकडील काहीही साहित्य आले नसल्याचे निदर्शनास आले. आपल्याच मित्राने आपली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आल्याने, महेश राजेंद्र भुजबळ (वय ३३, रा. कासारी ता. शिरुर जि. पुणे) यांनी याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली.

शिक्रापूर पोलिसांनी निलेश तुकाराम नेवसे (रा. कासारी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक रोहिणी सोनावले करत आहेत.

पुणे ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकपदी पुन्हा पंकज देशमुख कॅटच्या पुढील आदेशापर्यंत कायम राहणार

दिलीप वळसे पाटील अन् देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची…

शिरूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावर आढळला मृतदेह…

शिरुर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला छेडछाड करणारा आरोपी केला २४ तासाच्या आत गजाआड

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

ब्रेकिंग; पत्रकार असल्याचे सांगुन खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत खंडणीची मागणी, दोन जणांना अटक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

11 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago