पुणे ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकपदी पुन्हा पंकज देशमुख कॅटच्या पुढील आदेशापर्यंत कायम राहणार

पुणे (प्रतिनिधी) पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर संदीपसिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या बदलीच्या विरोधात पंकज देशमुख यांनी कॅट अर्थात सेंट्रल ॲडमिनीस्ट्रेट ट्रिब्युनलकडे दाद मागितली आहे. या प्रकरणी कॅटमध्ये आज (दि. ६) सुनावणी पार पडली. सुनावणी झाल्यानंतर कॅटने पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांना पुणे पोलीस अधीक्षक पदावरून मुक्त करण्यात येऊ नये, असे आदेश दिले.

 

कॅटने आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार एखाद्या अधिकाऱ्याची मुदतपूर्व बदली करताना त्याचे कारण देणे आवश्यक आहे. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर काही उपायुक्त अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता होती. गुरुवारी रात्री गृहविभागाकडून काही पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

पंकज देशमुख यांची पुणे पोलीस अधिक्षकपदी सात महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. देशमुख यांची मुदतपूर्व बदली करताना कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांची बदली करता येणार नाही. आता याप्रकरणी पुढील सुनावणी १९ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे पुणे पोलीस अधीक्षकपदी पंकज देशमुखच राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

शिरुर; वाळुंज यांच्या तक्रारी व आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु

शिरुर शहरात गणेशोत्सव व पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव डीजे मुक्त करण्यासाठी लवकरच बैठक; प्रशांत ढोले

शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान; प्रशांत ढोले

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

10 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago