नागपूर: नवी मुंबईत दोन विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटना गंभीर आहेत. यावरून मुलांना किती मानसिक तणाव आहे हे लक्षात येते. वाढती स्पर्धा, अभ्यासक्रमाचे ओझे अशा कारणांनी या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. नवी मुबंईती दोन मुलांच्या आत्महत्या झाल्याची घटना घडल्याची माहिती विधानसभेत देताना वडेट्टीवार बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले की, मुलं मानसिक तणावात शिकतात. त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे शाळेच्या वेळा बदलण्यासाठी शासनाकडे विचारणा केली होती. राज्यात शाळेची वेळ सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान आहे. यामुळे झोप पूर्ण होत नाही. मुलांमध्ये प्रचंड तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुलांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी शाळेच्या वेळा बदलल्या पाहिजेत. अपुऱ्या झोपेमुळे मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुलांचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी शासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…