क्राईम

मोटार सायकल चोरी करणाऱ्या शिरूर तालुक्यातील सराईत टोळीस अटक…

लोणी, पुणे (कैलास गायकवाड): पुणे ग्रामीण पोलिसांनी दमदार कामगिरी करताना मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीस अटक केली आहे. पारगाव (कारखाना) पोलिस ठाणे पुढील तपास करत आहेत.

एका चोरीस गेलेल्या स्कुटीची फिर्याद दाखल झाले वरुन पारगाव (कारखाना) पोलिस ठाणे येथे तक्रार दिलेवरून पारगाव (कारखाना) पोलिस ठाणे सदर गुन्हयाचा तपास करीत होते. पारगाव (कारखाना) पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे, सहा. पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याचे तपास पथक पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार अविनाश कालेकर, पोलिस अंमलदार चंद्रकांत गव्हाणे, पोलीस अंमलदार मंगेष अभंग, पोलिस अंमलदार संजय साळवे हे सदर गुन्हयाचा तपास करीत होते.

सराईत आरोपी 1) रितेश फकीरा रोकडे (वय 18 वर्षे रा.चांडोह ता. शिरूर जि.पुणे), 2) हर्षद जालींदर ढवळे (वय 21 वर्षे रा.फाकटे ता.शिरूर जि.पुणे), 3) प्रथमेश दत्तात्रय ढवळे (वय 19 वर्षे रा.फाकटे ता.शिरूर जि. पुणे), 4) अल्पवयीन मुलगा यांना सापळा लावून सदर टोळीस जेरबंद करून गुन्हयाचे तपास कामी अटक करून पोलिस कस्टडी दरम्यान त्यांचेकडून एकुण 27 मोटार सायकल हस्तगत करून एकुण 16 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी, खेड विभाग, खेड अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे पारगाव (कारखाना) पोलिस ठाणे, भाऊसाहेब लोकरे पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हेडकॉन्स्टेबल अविनाश कालेकर, पोलिस कॉन्स्टेबल संजय साळवे, चंद्रकांत गव्हाणे, मंगेश अभंग, पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन डामसे, अमोल वडेकर, शंतनू सांगडे, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके, राजेंद्र उतळे, निशा गुळवे, पोलिस कॉन्स्टेबल गजानन डाके, यशवंत साबळे, संदीप बोराडे, शितल पोखरकर, सुजाता जाधव, काजल फलके पारगाव (कारखाना) पोलिस ठाणे पोलिस मित्र रामभाऊ वाळुंज, प्रदिप बढेकर, अश्पाक शेख, संदीप घुले यांनी केली आहे.

गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह एकजण अटकेत; शिरूर पोलीसांची धडक कारवाई

शिरूरमध्ये कोयत्याच्या धाकाने मारहाण प्रकरणातील तिघांना अटक

Video: शिरूर तालुक्यातील चौघांना लोणावळा पोलिसांनी केली अटक…

शिरूर तालुक्यात अपघातानंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध घेत चालकाला अटक

जुन्नर तालुक्यातील खून प्रकरणी शिरूर तालुक्यातील एकाला अटक…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

6 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago