pargaon-police

जुन्नर तालुक्यातील खून प्रकरणी शिरूर तालुक्यातील एकाला अटक…

क्राईम

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे जुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या खुनात पाहिजे असलेल्या आरोपीला पारगाव कारखाना पोलिस स्टेशनने बेल्हा-जेजुरी महामार्ग लगत मौजे लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) गावच्या हद्दीत अटक केली आहे.

नारायणगाव पोलिस स्टेशन येथे गु.र.नं 58 /2024 भादवि कलम 302,34 नुसार दाखल असून यातील फिर्यादी यांचे नातेवाईक अक्षदा दीपक पवार हिचे लग्नामध्ये फिर्यादी यांचे दाजी कैलास गुलाब पवार व सुनील मारुती पवार हे वरातीमध्ये नाचत असताना दाजींचा पाय सुनील मारुती पवार याच्या पायावर पडल्याने भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून यातील आरोपी मजकूर यांनी फिर्यादी यांचे दाजी कैलास गुलाब पवार (38 वर्ष राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे) यांचे छातीत पाठीत खांद्यावर चाकूने मारून जीवे ठार मारले आहे. गुन्हा घडले पासून यातील आरोपी हा फरार होता.

दाखल झालेल्या फिर्यादी वरून सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पारगाव का पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे सहा. पोलिस निरीक्षक यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सुनील मारुती पवार (रा.केंदूर ता. शिरूर जि. पुणे) हा मौजे लोणी गावचे हद्दीत बेल्हा जेजुरी महामार्ग लगत थांबून आहे. त्या अनुषंगाने पारगाव का पोलिस स्टेशन येथून स्टाफ तात्काळ मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी सापळा रचून शिताफिने आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कारवाई करिता सदर आरोपीस नारायणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधीकारी सुदर्शन पाटील यांचे मागदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस उप-निरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पो. हवालदार दत्तात्रय जढर, पो. अंमलदार संजय साळवे, पो. अंमलदार मंगेश अभंग होमगार्ड दिपक पारधी व होमगार्ड केंगले सर्व नेमणूक पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशन यांनी केली आहे.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात चुलती व पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ

शिरुर; घोडनदीत रस्सीने बांधून टाकलेला अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलले…

शिरुर तालुक्यात हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी करत वृद्ध दाम्पत्याला गंभीर मारहाण

शिरुरच्या सराफावर बंदुकीने हल्ला करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक

शिरुर तालुक्यात दारु पिण्याच्या वादातून झोपेलेल्या पत्नीचा गळा आवळून खून