kadba-chor
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सध्या ज्वारी काढणीला वेग आला असून दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. शेतकरीही मोठया प्रमाणात ज्वारीचे पिक घेत नसल्यामुळे कडब्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यामुळे रांजणगाव परीसरात एका भामट्याने अनोखी शक्कल लढवत एका शेतकऱ्याच्या वावरातील थोड्या थोड्या करुन एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ७५ कडब्याच्या पेंढ्यांची चोरी केली आहे.
रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील शेतकरी प्रताप माणिक फंड यांच्या शेतातून दिवसाढवळ्या बुधवारी (ता. २९) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रांजणगाव गणपती ते करडे अष्टविनायक महामार्ग लगत संतोष वजन काट्या समोरुन हा भामटा कडबा चोरी करुन जाताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अष्टविनायक महामार्गाने तो बाभुळसर खुर्द मधून करडे गावाच्या दिशेने गेला आहे.
कडबा पेंढी चोरी करणाऱ्या चोरट्याकडे काळ्या रंगाची दुचाकी एक्टिवा गाडी असुन त्याने पिवळा शर्ट घातलेला आहे. या भामट्याने प्रताप माणिक फंड यांच्या शेतातून ७५ पेक्षा जास्त कडब्याच्या पेंढ्या चोरल्या आहेत. जर या चोरट्याला कोणी ओळखत असेल तर प्रताप फंड यांच्या ९१६८०००९९९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…
शिरुर तालुक्यातील मलठणमध्ये किराणा व्यवसायिकाला दोघांची मारहाण
शिरुर शहरात पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरांनी हिसकावला
शिरुर; शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरी करणाऱ्याला पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक
Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त…
शिरूर! काही मिनिटातच फोर व्हीलर गाड्या लंपास करणारा कुख्यात चोरटा गजाआड…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…