crime
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील राहुल बाबुराव राक्षे या युवकाला दोघा जणांनी शिवीगाळ करून दगडाने गालावर नाकावर, भुवईवर जबर मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, २१ जुलै रोजी सायंकाळी ५.३०वाच्या सुमारास काठापुर खुर्द गावच्या जिल्हा परिषद शाळेसमोर १) सागर विलास उदागे २) संजय फकीरा उदागे (दोघे रा.पिंपरखेड ता.शिरूर जि.पुणे) हे राहुल राक्षे याला म्हणाले की, तुला खुप माज आला आहे अशी शिवीगाळ करून, तुझ्या टंगड्या काढतो. अशी धमकी देवुन, ते दोघे राहुल राक्षे याच्या अंगावर धावुन आले. त्यावेळी सागर उदागे याने राहुल राक्षे पाठीमागुन धरून ठेवले व संजय उदागे यांने हातात दगड घेवुन राहुल राक्षेच्या गालावर, नाकावर, भुवईवर मारून दुखापत केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी त्या दोघा विरूद्ध राहुल राक्षे याने तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो. हवा. भगत हे करत आहे.
शिरूर तालुक्यात महिलेला शिविगाळ करून केला विनयभंग…
शिरूर तालुक्यात खंडनी न दिल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल; पाहा नावे…
शिरूर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक…
शिरूर तालुक्यातील दांपत्याचे अपहरण करुन उलटे टांगून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…
शिरूरमध्ये एकाला लोखंडी रॉडने मारहाण; गुन्हा दाखल…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…