शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात मुरूम टाकण्याकरता महिन्याला १५ हजार रूपयांची खंडणी न दिल्याने आठ जणांची एकाला शिविगाळ करून मारहाण केली. शिवाय, ट्रकचेही नुकसान केले आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील कर्डे येथील अवैध मुरुम ऊपसा हा विषय ऐरणीवर आला आहे. मुरुम उपस्याच्या वादातून एकमेकांच्या जीवावर उठले आहे. राजरोसपणे प्रशासणाच्या नाकावर टिच्चून मुरुम ऊपसा व वाहतुक होत आहे. तेथील तलाठी, मंडल आधिकारी, बीट अंमलदार पोलिस मग नेमक काय करतात? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मोठी आर्थिक तडजोड करुन हा व्यवसाय चालू असल्याची चर्चा शिरूर तालुक्यात होत आहे. याच वादाची किनार या प्रकरणाला लागली असून बेकायदेशीर जमाव जमवून खंडणी मागून आठ जणांनी एकाला मारहाण करून त्याच्या ट्रकचेही नुकसान केले आहे. शिरूर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, २९ जुलै रोजी दुपारी १.२० वा. सुमारास मौजे एस. व्ही. एस कंपनी येथील किरण रोडे याच्या निळ्या रंगाचा बंद टपरीजवळ फिर्यादी निलेश बाळासो महाडीक हे त्यांच्या कार मधून जात होते. अभिशेक मिसाळ, सकेंत महामुनी व त्यांचे बरोबर एक अनोळखी मुलगा यांनी त्यांच्याजवळीळ पल्सर मोटाररसायकल आडवी मारून निलेश महाडिक यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु निलेश महाडिक तेथून कार घेवून पळून गेले. नंतर दुपारी दोनच्या सुमारास समाधान चौक, करडे येथे फिर्यादीनी मुरूम टाकण्या करीता महीन्याला १५ हजार रूपये हप्ता न दिल्याच्या कारणावरून १) अभिषेक मिसाळ २) संकेत महामुनी ३) बाला शिंदे सर्व रा. शिरूर ४) शुभम पुर्ण नाव पत्ता माहीत नाही ५) नवनाथ कलींदर, ६) टिनु शेळके व ७) रोहन पंचमुख सर्व रा. राजणगाव ता. शिरूर पुणे ८) सुरज पाडळे रा. सोनेसांगवी ता. शिरूर पुणे यानी बेकायदा गर्दी जमाव जमवून निलेश महाडिक यांचा हायवा ट्रक न. एम.एच १२ यु.एम ९८७९ अडवून चालक जावेद हमीद शेख याला हाताने मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्या हातातील लाकडी दाडके व दगडाने मारून हायवा ट्रकचे नुकसान केले आहे.
दरम्यान, शिरूर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिरूर पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हे करत आहेत.
शिरूर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक…
रांजणगाव येथील जल प्रदुषण करणाऱ्या MEPL कंपनीवर बंदी आणा खासदार डॉ अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी
शिरूर तालुका! मैत्रिणीकडे जाणून येते असे सांगून गेलेली मुलगी घरी परतलीच नाही…
शिरुर तालुका म्हणजे महसूल, पोलिस, MIDC तील कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण…?
शिरूर शहरात जुगार खेळणाऱ्यांवर ४ जणांवर गुन्हा दाखल; पाहा नावे…