crime

शिरूर! तुला खुप माज आला आहे का, तुझ्या टंगड्‌याच काढतो…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील राहुल बाबुराव राक्षे या युवकाला दोघा जणांनी शिवीगाळ करून दगडाने गालावर नाकावर, भुवईवर जबर मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, २१ जुलै रोजी सायंकाळी ५.३०वाच्या सुमारास काठापुर खुर्द गावच्या जिल्हा परिषद शाळेसमोर १) सागर विलास उदागे २) संजय फकीरा उदागे (दोघे रा.पिंपरखेड ता.शिरूर जि.पुणे) हे राहुल राक्षे याला म्हणाले की, तुला खुप माज आला आहे अशी शिवीगाळ करून, तुझ्या टंगड्‌या काढतो. अशी धमकी देवुन, ते दोघे राहुल राक्षे याच्या अंगावर धावुन आले. त्यावेळी सागर उदागे याने राहुल राक्षे पाठीमागुन धरून ठेवले व संजय उदागे यांने हातात दगड घेवुन राहुल राक्षेच्या गालावर, नाकावर, भुवईवर मारून दुखापत केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी त्या दोघा विरूद्ध राहुल राक्षे याने तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो. हवा. भगत हे करत आहे.

शिरूर तालुक्यात महिलेला शिविगाळ करून केला विनयभंग…

शिरूर तालुक्यात खंडनी न दिल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल; पाहा नावे…

शिरूर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक…

शिरूर तालुक्यातील दांपत्याचे अपहरण करुन उलटे टांगून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…

शिरूरमध्ये एकाला लोखंडी रॉडने मारहाण; गुन्हा दाखल…