क्राईम

शिरूर तालुक्यातील एका विहीरीत आढळला महिलेचा मृतदेह…

शिरुर (अरुणकुमार मोटे) : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सोदक वस्ती येथे शेतामध्ये सासऱ्याला जेवणाचा डब्बा घेऊन गेलेल्या सुप्रिया शहाजी सोदक (वय ३२) या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मयत महिलेचे सासरे सुरेश मारूती सोदक यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ : ३० वा. च्या सुमारास सुरेश सोदक हे शेतात शेतीचे काम करत होते. त्यावेळी त्यांची सुन सुप्रिया शहाजी सोदक ही त्यांना जेवणाचा डबा घेऊन शेतात आली व त्यांना फोन करून म्हणाली, ‘तुमचा डबा आणला आहे. जेवण करूण घ्या’ असे तिने सांगितले. त्यानंतर सासरे सुरेश सोदक हे २/३०वा. सुमारास जेवण करण्यासाठी आले त्यावेळी त्यांची सुन सुप्रियाला त्यांनी फोन केला असता तीने फोन उचलला नाही.

सुरेश सोदक यांनी आजुबाजुला शेतात सुनेचा शोध घेतला त्यावेळी ती त्यांना शेतातील विहीरीत तरंगतानी दिसली, त्यावेळी लगेच त्यांनी व त्यांचा शेजारी सुभाष पानसरे यांनी तिला बाहेर काढले व उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय शिरूर येथे आणले. त्या वेळी डॉक्टारांनी तपासून ती मृत झालेचे सांगितले. या घटनेचा पुढील तपास टाकळी हाजी औट पोस्टचे पो. हवा. शरद वारे हे करत आहेत.

शिरूर पोलिसांनी गहाळ झालेले मोबाईल तपास करून मुळ मालकांना केले स्वाधीन…

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…

शिरूर पोलिसांनी टाकला गावठी दारू हातभट्टीवर छापा; मुद्देमाल नष्ट…

शिरूर तालुक्यात प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर तालुक्यातील एकाला पिस्टल बाळगल्याप्रकरणी सापळा रचून केली अटक…

शिरूर तालुक्यात बांगलादेशी नागरिकांची गँग पकडली; मतदानकार्ड, पॅनकार्ड…

शिरूर तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

17 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago