क्राईम

शिरूर पोलिसांनी गहाळ झालेले मोबाईल तपास करून मुळ मालकांना केले स्वाधीन…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत चोरी गेलेल्या १० मोबाईल फोनचा शिरूर पोलिसांच्या पथकाने शोध घेवून मुळ मालकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती शिरूर चे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.

शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील शिरूर बाजारपेठ, शिरूर बस स्थानक व शिरूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल गहाळ झाल्याचे अर्ज पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाले आहेत. गहाळ झालेले मोबाईल फोन हे ट्रेस करून पुन्हा नागरिकांना परत करण्याबाबत पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सुचना दिल्या होत्या.

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांनी ट्रेसिंगला लावले. गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषन करण्याचे काम सुरू केले. तपासाअंती चोरी गेलेल्या २,२५,०००० रूपये किंमतीच्या १० मोबाईल फोनचा शिरूर पोलिसांच्या पथकाने शोध घेवुन मुळ मालकांना परत करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे.

याकामी गुन्हे शोध पथकामधील सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस अमंलदार विजय शिंदे, पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार निरज पिसाळ, रघुनाथ हळनोर, निखील रावडे, नितेश थोरात यांचे पोलीस पथकाने परिश्रम घेतले. मुळ मालकांना हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले असुन शिरुर तालुक्यातील नागरीकांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…

शिरूर पोलिसांनी टाकला गावठी दारू हातभट्टीवर छापा; मुद्देमाल नष्ट…

शिरूर तालुक्यात प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर तालुक्यातील एकाला पिस्टल बाळगल्याप्रकरणी सापळा रचून केली अटक…

शिरूर तालुक्यात बांगलादेशी नागरिकांची गँग पकडली; मतदानकार्ड, पॅनकार्ड…

शिरूर तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

13 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

21 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago