shirur-police-gutkha

शिरूर तालुक्यात प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई…

क्राईम

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत रामलिंग परीसरात अवैध्यरीत्या तीस हजार आठशे रुपयांचा गुटखा वाहतूक करताना सचिन अंकुश कु-हाडे हा गाडीसह मिळून आल्याने त्याच्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे शिरूर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील हद्दीत रामलींग येथील शिक्षक कॉलनी (ता. शिरूर) येथे सचिन अंकुश कु-हाडे (रा. पाबळफाटा, शिरूर) हा विना परवाना प्रतिबंधित असा आगामडी कंपनीचा गुटखा, एम कंपनीची तंबाखु, विमल कंपनीचा गुटखा व व्ही १ कंपनीची तंबाखू असा माल वाहतूक करत असल्याची बातमी मिळाली होती.

रामलिंग येथील शिक्षक कॉलनी येथे पो.हवा. भवर, पो.हवा. परशुराम सांगळे व पो.हवा. नितिन सुद्रिक यांनी छापा कारवाई करून एकुण ३०,८००/- रु. किमतीचा प्रतिबंधित असा आरएमडी कंपनीचा गुटखा, एम कंपनीची तंबाखु, विमल कंपनीचा गुटखा व व्ही १ कंपनीची तंबाखु असा गुटखा त्याच्या ताब्यातील ४,००,०००/- रू. किंमतीची टोयाटो कंपनीचे इटीऑस कार नं. एम.एच ०४ एफ.आर १०७१ मध्ये विनापरवाना वाहतुक करीत असताना मिळून आला म्हणून आरोपी सचिन अकुश कु-हाडे (वय ३०, रा. पाबळफाटा, शिरूर) याच्याविरुध्द शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख (भा.पो.से.), अपर पोलिस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरूर उपविभाग प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. भवर, पो.हवा. परशुराम सांगळे, पो.हवा. नितिन सुद्रिक यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. हनुमंत गिरी हे करीत आहेत.

शिरूर तालुक्यातील एकाला पिस्टल बाळगल्याप्रकरणी सापळा रचून केली अटक…

शिरूरमध्ये लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल…

शिरुरच्या पुर्व भागात मुजोर वाळु माफियांचा हौदोस; गुनाट येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

शिरूर तालुक्यात हॉटेल मधील हुक्का पार्टीवर पोलिसांची कारवाई…

शिरुर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ४ अल्पवयीन मुलीं, महीला व ६ बेपत्ता मुलींचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन