ranjangaon-police

शिरूर तालुक्यातील एकाला पिस्टल बाळगल्याप्रकरणी सापळा रचून केली अटक…

क्राईम

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर पिस्टल बाळगल्या प्रकरणी बाभुळसर येथील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारवर्ग असल्याने त्यांच्या मदतीने परराज्यातुन अवैधरित्या पिस्टल सारखे अग्नीशस्त्रे मागविले जातात. पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये अवैध अग्नीशस्त्रे बाळगणा-यांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी अशा प्रकारे अवैधरीत्या अग्नीशस्त्रे बाळगणा-या रेकॉर्डवरील आरोपींबाबत माहिती काढून कारवाई करणे बाबत तपास पथकास सुचना दिलेल्या आहेत.

पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना आज (शनिवार) बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कारेगाव कर्डे रोडलगतच्या निर्जन स्थळी सुशांत कराळे ( रा. बाभुळसर खुर्द) हा पिस्टल बेकायदेशीरपणे जवळ बाळगुन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, पो.हवा. विलास आंबेकर यांना योग्य त्या सुचना देवून सापळा कारवाई कामी पाठविले. तपास पथकाने कारेगावचे हद्दीतील कारेगाव ते कर्डे रोडलगतच्या भुत बंगला येथे सापळा लावला. यावेळी एक संशयीत व्यक्ती दुपारच्या सुमारास मिळून आला. त्याची सोबतच्या पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३५,५०० रु. किंमतीचे एक सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्टल, व एक जिवंत काडतुस असे बेकायदेशीररित्या जवळ बाळगले स्थितीत मिळून आले आहे. सुशांत रमेश कराळे (वय २७ वर्षे, रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे ) असे असल्याचे सांगीतले आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी पंकज देशमुख ( पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण ), रमेश चोपडे (अप्पर पोलिस अधिक्षक पुणे ), प्रशांत ढोले (उपविभागीय पो. अधिकारी शिरुर विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, पो.हवा. विलास आंबेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पो.हवा. अभिमान कोळेकर, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हे करीत आहेत.

दरम्यान, सुशांत रमेश कराळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द यापुर्वी खुनाचा व आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीकडून यापुर्वी देखील फेब्रुवारी २०२४ मध्ये अशाच प्रकारचे एक पिस्टल बाळगले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. सदर आरोपीविरुध्द तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला असुन त्याला लवकरच पुणे जिल्ह्यातुन तडीपारीचा आदेश काढण्यात येणार आहे. तसेच सदर आरोपीने सदरचे पिस्टल कोणाकडुन आणले आहे व त्याचा सदरचे पिस्टल बाळगण्याचा नेमका काय उद्देश आहे, याबाबत तपास सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत ३ आरोपींकडुन २ गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुस जप्त

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्यास रांजणगाव पोलीसांनी केली अटक

शिरूर तालुक्यात गावठी पिस्टल बाळगून खुन, अपहरण, खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद…

रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई; 8 गावठी पिस्टल जप्त; धाबे दणाणले…

रांजणगाव MIDC पोलीसांनी पिस्टल व कोयते जवळ बाळगलेल्या दोन जणांना केले जेरबंद