क्राईम

शिरूर तालुक्यात युवकाचा खून; खुनी दोन तासात पोलिसांच्या ताब्यात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): वडनेर (ता. शिरूर) येथे आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबिर खान (वय २२) या युवकाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. २४) सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी शाहिद शरीफ बागवान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ रेल्वे स्टेशन, ता. भुसावळ, जि. जळगाव) याला दोन तासात अटक केली आहे.

वडनेर-फाकटे रोडवर वडनेर हद्दीत जाकिर सय्यद (मुंबई) यांच्या फार्महाऊस वर देखाभालीसाठी त्यांचाच नातेवाईक असलेला आत्ताउल्ला उर्फ मोईन तेथे राहत होता. शाहिद बागवान हा त्यांच्याकडे कामासाठी आल्याने दोघेही सोबतच राहत असत. खून करण्यापूर्वी शाहिद याने रहात असलेल्या ठिकाणच्या सर्व खोल्यांची दारे बंद करून आतील खोलीत कुऱ्हाडीने डोक्यात, मानेवर वार केले आणि तेथून पसार झाला. खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोशल मीडिया द्वारे त्या व्यक्तीचा फोटो व्हायरल केला. यामुळे ती व्यक्ती दोन तासांच्या आत जांबुत (ता. शिरूर) येथे असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यास तात्काळ ताब्यात घेवून अटक करण्यात आली. सदर व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत. पोलिसांनी दोन तासांच्या आत आरोपीस ताब्यात घेतले याबद्दल नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

संबंधित कारवाई शिरूरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस उपनिरिक्षक सुनील उगले, पोलिस अंमलदार दिपक पवार, निलेश शिंदे यांनी केली आहे.

जमिनीचा बांध कोरला म्हणून पुतण्याचा केला खून…

शिरूर तालुक्यात पेट्रोल टाकून प्रेत जाळणारे गजाआड; प्रेमसंबंधातून खून…

शिरुर तालुक्यात हुंड्याच्या पैशाच्या वादातून एकाचा खून

शिरुर तालुक्यात अज्ञात कारणातून परप्रांतियाचा खून

मित्रानेच केला मित्राचा खून, अवघ्या १२ तासांत लावला खूनाचा छडा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago