क्राईम

शिरूर तालुक्यातील महिलेचा प्रियकराने संशयावरुन केला खून…

पुणेः अनोळखी महिलेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना ‘त्या’ महिलेची ओळख पटलेली नसल्याने तिची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पण, अनोळखी महिलेच्या खुनाचा लोणी काळभोर पोलिसांनी छडा लावला आहे.

लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीत ०५ जुलै २०२२ रोजी थेऊर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेत एक अनोळखी महिला वय अंदाजे २० ते २५ वर्ष, रक्ताचे थारोळ्यात पडलेली आढळून आली होती. सदर घटनेची पाहणी केली असता तिच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला असल्याचे निष्पन्न झाले. मृत महिलेस ओळखणारे कोणीही नसल्याने अज्ञात आरोपीने अज्ञात कारणाने डोक्यात दगड घालून खुन केल्याचा गुन्हा लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे भा.द.वि.कलम ३०२,२०१ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. मृत अनोळखी महिलेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना त्या महिलेची ओळख पटलेली नसल्याने तिची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस उप-आयुक्त परि.०५ नम्रता पाटील, बजरंग देसाई, सहा. पोलिस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांनी तपास पथकास सुचना देवून आरोपीचे शोध घेण्यास सांगितले. तांत्रिक विश्लेषणाचे आधारे मृत महिलेचा शोध घेतला असता महिलेचे नाव वैशाली लाडप्पा दुधवाले, (रा. कोरेगाव भीमा, ता, शिरुर, पुणे व मुळगाव रा.चिवरी, ता.तुळजापुर, उस्मानाबाद) असल्याचे निष्पन्न झाले. तिचे नातेवाईकाचा शोध घेवून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता मृत महिलेचे एकासोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तपास अधिक गतिमान करून मृत महिलेचा प्रियकर महेश पंडित चौगुले (वय २४, रा. तळेगाव दाभाडे, पुणे मुळगाव रा.चिवरी, तुळजापुर, उस्मानाबाद तळेगाव दाभाडे, पुणे) परिसरातून ताब्यात घेतले असता त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु त्यांचेकडे अधिक सखोल तपास केला असता त्याने मृत महिला वैशाली लाडप्पा दुधवाले हिच्या सोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले व वैशालीच्या चारित्र्याचा संशयावरुन तिचा त्याठिकाणी डोक्यात दगड मारुन खुन केला असल्याचे कबुली लोणी काळभोर पोलिसांना दिली.

सदर संशयित आरोपीस ०९ जुलै २०२२ रोजी रात्री १:०० वा अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ५ जुलै २०२२ रोजी पासून सदर मयत महिलेची ओळख पटविण्याबाबत पोलिसांनी अनेक प्रयत्न केले होते. परंतु, त्यात यश येत नव्हते. सदर गुन्हयात कसलाही धागादोरा नसताना मयत महिला व आरोपी याचा थेऊर परिसराशी कसलाही सबंध नसताना पोलिसांनी अतिशय चाणक्य पध्दतीने तपास करुन गुन्हा उघड केला मृत महिला हिची ओळख पटल्यानंतर तातडीने हालचाल करुन काही तासाच्या आत आरोपीला बेढ्या ठोकल्या.

unique international school

संबंधित कारवाई पोलिस सह आयुक्त, पुणे शहर नामदेव चव्हाण, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे, सदर उल्लेखनिय कामगिरी अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, शहर, नम्रता पाटील, पोलिस उप-आयुक्त परिमंडळ- ०५, बजरंग देसाई, स.पो.आ.एन हडपसर विभाग, राजेन्द्र मोकाशी, वपोनि.सुभाष काळे पोनि (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अमित गोरे, पोहवा/नितीन गायकवाड, संतोष होले, आनंद पाटोळे, पोना/ श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, पो.शि/ गणेश भापकर, राजेश दराडे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, दिपक सोनवणे, मल्हारी ढमढेरे, विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 आठवडा ago