शिरूर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय ५0) यांचा कवठेयेमाई हद्दीतील गांजेवाडी, गणेशनगर परिसरात मृतदेह (दि. २०) रोजी उसाच्या शेतात सापडला होता. त्यांची टू व्हीलर गाडी ही त्याच परिसरात आढळल्याने त्यांचा मृतदेह थोड्या अंतरावरच मिळून आला होता. ते (दि. १९) पासून घराबाहेर गेले होते ते रात्री घरी न आल्याने त्यांच्या मुलांनी शोधा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची गाडी गणेशनगर,गांजेवाडी परिसरात सापडली. त्या गाडीच्या जवळपास त्यांचा शोध घेतल्यानंतर काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला.
या खुनाबाबत शिरूर पोलिसांनी तपास अधिक गतीमान केला आहे. प्राथमिक पाहणीत हा प्रकार वैमनस्य, जुने वाद,किंवा पैश्याच्या वादातून झाला असावा, अशी शक्यता सुत्रांनी दिलेल्या माहीती नुसार व्यक्त केली जात आहे.पोलिसांनी टेके यांचे कुटुंबीय, नातेवाईक व काही गावकऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. मृतदेहाच्या जखमांवरून धारदार हत्याराचा वापर झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान हा खुण कोणत्या कारणासाठी कोणी केला? या खुनामाचे गुढ उकलण्याचे शिरूर पोलिसांपुढे मोठे आव्हान बनले आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…