शिरूर तालुका

संततधार पावसामुळे शिरूर, शिक्रापूर महावितरणकडून शेतकरी व वीजग्राहकांना काळजी घेण्याचे आवाहन

शिरूर (अरुणकुमार मोटे): गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यात संततधार पावसाचा जोर कायम आहे. यामुळे शेतामध्ये व रस्त्यांवर लघुदाब व उच्चदाब वीज वाहिनीच्या तारा तुटून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच झाडे पडून वीज वाहिन्यांवर येण्याचेही प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीत शेतकरी व नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शरद माने व शिक्रापूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी संयुक्त निवेदनात सांगितले की, “सध्या पावसामुळे जमीन ओली झाल्याने वीज वाहिन्यांवर झाडे पडण्याची शक्यता अधिक आहे. तसेच वारंवार वीजतारा तुटून शेतामध्ये किंवा रस्त्यावर पडू शकतात. अशा वेळी शेतकरी व नागरिकांनी कोणतीही निष्काळजीपणा करू नये.”

तुटलेल्या वीजतारांना कधीही हात लावू नये.तुटलेले तारे दिसल्यास सुरक्षित अंतरावरून इतरांना सावध करावे.अशा घटना आढळल्यास नजिकच्या महावितरण कार्यालयाशी किंवा अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा.पावसाळ्यात ओल्या हातांनी वीज उपकरणे वापरणे टाळावे.उपकार्यकारी अभियंता माने व जाधव यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांनी थोडी दक्षता घेतली तर मोठे अपघात टाळता येऊ शकतात. महावितरणकडून तातडीने कार्यवाही करण्यासाठी नागरिकांनी तुटलेल्या तारांची माहिती द्यावी. सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचे काही नाही.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

9 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

9 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

9 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago