शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील गणेश नगर मधील एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रक्कम चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील गणेश नगर मधील चंद्रकांत कुंभार हे बाहेर गेलेले असताना सकाळच्या सुमारास त्याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे शेजारील नागरिकांना दिसले. याबाबतची माहिती कुंभार यांना मिळताच त्यांनी घरी येत घरात पाहणी केली असता घरातील कपाट उघडे व सर्व साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कापतात ठेवलेले 35 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले.
याबाबत चंद्रकांत देविदास कुंभार (वय ६०) रा. गणेश नगर कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…