Crime
शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथील बेन वस्ती परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या गोठ्यातील २ जर्शी गायांची चोरी झाली असल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
पाबळ (ता. शिरुर) येथील बेन वस्ती परिसरातील शेतकरी नवनाथ चौधरी यांनी काही गाया पाळलेल्या आहेत, २१ जुलै रोजी सायंकाळी चौधरी हे त्यांच्या गोठ्यातील गायांना चारापाणी घालून झोपले होते. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा चौधरी उठले असता त्यांना गोठ्यातील दोन जर्शी गाय दिसल्या नाही. त्यामुळे गाय सुटून बाजूला गेल्या असतील या हेतूने चौधरी यांनी गायांचा आजूबाजूला तसेच जवळील थिटेवाडी परिसरात शोध घेतला. मात्र गाय मिळून आल्या नाही त्यामुळे गाया चोरी गेल्या असल्याची खात्री चौधरी यांची झाली.
याबाबत नवनाथ साहेबराव चौधरी (वय ४२) रा. बेनवस्ती पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सुतार हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…