crime
पुणे : बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय युवकावर कोयत्याने वार करण्यात आल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. ही हत्या समलैंगिक संबंधातून झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.
मृत्युमुखी पडलेला युवक हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो वाढेबोल्हाई येथे एका होस्टेलमध्ये राहत होता. त्याने त्याला रूग्णालयात घेऊन जाणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीस आपल्याला मारणाऱ्या आरोपीचे नाव आणि सदरचा प्रकार सांगितला आहे. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचे त्याने सांगत असतानाच तो बेशुद्ध झाला होता.
तपासादरम्यान समोर आलेल्या बाबीनुसार सदरची हत्या ही समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे. परंतु, नेमक्या कारणाचा पोलीस अजूनही शोध घेत आहेत. आरोपीच्या शोधार्थ दोन पथकं रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी ताब्यात येण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात येत आहे.
मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. 21 वर्षीय तरुण महाविद्यालयातून घरी निघाला होता. यावेळी ओळखीतीलच एकाने त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. जखमी युवकाला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्रावमुळे त्याला ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. ससूनला घेऊन जात असताना वाटेतच जखमी युवकाचा मृत्यू झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वाघोलीतील लॉजवर प्रेमीयुगुलाची गळफास घेत आत्महत्या…
वाघोलीत गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना युवकाचा मृत्यू…
वाघोलीत गर्भवती महिलेच्या पोटात मारली लाथ अन्…
वाघोलीत प्रेमप्रकरणातून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या…
वाघोली येथे प्रेयसीने प्रियकराचा खून करत हाताची नस कापून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…