क्राईम

फेसबुकवरील मित्राच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा…

औरंगाबाद: विभक्त होऊन देखील पती सतत त्रास देत असल्याने पत्नीने पतीची निर्घुण हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली असून 12 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पत्नीने मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना घडली आहे.

पतीला मनसोक्त दारु पाजून त्याच्या पोटात चाकूने वार करीत पत्नीने त्याचा काटा काढला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.विशेष म्हणजे आरोपी महिलेने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फेसबुकवर भेटलेल्या प्रियकराची मदत देखील घेतली होती. विजय संजयकुमार पाटणी (35, रा. एन-६, सिडको) असे मृताचे नाव असून, पत्नी सारिका विजय पाटणी (30, रा. सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी) आणि तिचा प्रियकर सागर मधुकर सावळे (25 रा. शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती त्रास देत असल्यामुळे संपविले…

सारिका व विजयचा १० एप्रिल २०१० रोजी प्रेमविवाह झाला होता. या दोघांना नऊ वर्षांची एक मुलगीही आहे. मात्र, काही वर्षांपासून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. त्यामुळे दोघे एकत्र राहत नव्हते. सारिका बेपत्ता झाल्याची तक्रार विजय याने बेगमपुरा व एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंदविली होती. याच काळात सारिकाची मैत्री सागरसोबत झाली. तेव्हापासून ती आईकडेच राहत होती. काही दिवसांपासून विजय हा पत्नीकडे सतत दारू पिऊन येत त्रास देत होता. त्याच्या त्रासाला सारिका कंटाळली होती. तिने पतीला संपविण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी तिने १८ ऑक्टोबरच्या रात्री पती विजय यास वाल्मी परिसरातील सोलापूर-धुळे महामार्गालगत गोड बोलून नेले. त्यांच्या पाठोपाठ तिचा मित्र सागरही आला. पती-पत्नी बसलेले असतानाच सारिकाने पतीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला. सागरही मदतीला होताच. दोघांनी मिळून विजय यास संपविल्यानंतर मृतदेह झुडपात टाकून पोबारा केला. २२ ऑक्टोबरला पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून सारिका परभणी जिल्ह्यात नातेवाइकांकडे निघून गेली.

गुन्हे शाखेने कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपी पत्नीसह मित्राला शोधत खुनाचा उलगडा केला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

7 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

19 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

20 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago