रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथील यश इन चौकात शनिवारी रात्री 9 च्या दरम्यान अज्ञात पीक वाहनाने धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असुन मनोहर गुलाबराव जाधव (वय 32) रा. पाचंगे वस्ती, ढोकसांगवी ता.शिरुर जि. पुणे, मूळ रा. सरांबा ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणा असे त्या युवकाचे नाव असुन याबाबत त्याचा भाऊ अनंता गुलाबराव जाधव रा.पाचंगेवस्ती, ढोकसांगवी यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव येथील यश इन चौकात मयत मनोहर जाधव शनिवारी रात्री 9 च्या दरम्यान पुणे-नगर महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या पीकअपने जाधव याच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहायक फौजदार पासलकर हे या घटनेचा तपास करत आहेत.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…