shirur-taluka-logo
नवी दिल्ली: एका गाईने एका खाटिकाला आयुष्यभराची शिक्षा दिली आहे. खाटिकाने ज्या दोरीने तिला बांधलं होते, त्याच दोरीने तिने खाटिकाला फरफटत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित घटना पाकिस्तानमधील आहे.
एका गाईने खाटिकावरच पलटवार केला आहे. तिला ज्या दोरीने बांधलं जात होतं, त्याच दोरीने तिने खाटिकाला आपल्यासोबत रस्त्यावर खेचत, फरफटत अगदी दूरपर्यंत नेले. हा खाटिक गाईला खेचण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे गाय इतकी संतप्त झाली की तिने त्यालाच खेचले.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, खाटिकासह चार जण गायीला दोरीने बांधून तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न कर होते. सुरुवातीला गाय त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करते. पण ते लोक तिला घाबरवताना दिसतात. अखेर गाय बघून बघून घेते आणि संधी मिळताच तिथून पळ काढते. यावेळी तिला नियंत्रित करणाऱ्या एक व्यक्ती गाईला बांधलेल्या दोरीतच अडकला आहे. गाय त्याला तसंच खेचत घेऊन पळत सुटते.
काही लोक त्याला वाचवण्यासाठी आणि गाईला पकडण्यासाठी त्यांच्या मागे पळताना दिसतात. पण गाय काही थांबत नाही. बऱ्याच दूरपर्यंत ती जाते. काही अंतरावर तो खाटिक बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेला दिसतो. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, संबंधित घटना पाकिस्तानातील कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर परिसरातील ही घटना असल्याचे सांगितले जाते आहे.
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…