मनोरंजन

Video: मराठी चित्रपटातील ‘आवडाक्का’ काळाच्या पडद्याआड…

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज (रविवार) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते. ‘दे दणादण’ चित्रपटातील ‘आवडाक्का’ ही भूमिका प्रचंड गाजली होती.

प्रेमा किरण यांनी चित्रपटांमध्ये भूमिका साकारतानाच निर्मात्या देखील बनल्या होत्या. 1989 मध्ये आलेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली होती. नुकतेच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे देखील निधन झाले होते. यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘हे तर काहीच नाय’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी दे देणादण चित्रपटातील गंमतीशीर किस्से सांगितले होते. त्यांनी नारायण देऊळगावकर यांनी दिग्दर्शित आणि महेश कोठारे यांची निर्मिती असलेला दे दणादण या चित्रपटाविषयी गप्पा मारल्या. त्यावेळी प्रेमा यांनी मजेशीर गमती जमती सांगत ‘मी पडले म्हणून दे दणादण हा चित्रपट हिट झाला’ असे वक्तव्य केले होते.

प्रेमा किरण हा किस्सा सांगताना म्हणाल्या, ‘पोलिस वाल्या सायकल वाल्या’ या गाण्याच्या शूटिंगवेळी महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत हे गाणं संपवायचं, अशी ताकीद दिली होती. त्यानंतर या गाण्याचं शूटिंग देखील सुरु झाले. मात्र, शूटिंग सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती. अवघी दोन दोन पावलं पुढे जाऊन लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेमा यांना खाली पाडले. या चित्रपटाध्ये प्रेमा किरण या सायकलीवरून तीन वेळा पडल्या होत्या. चित्रपटाचा हा किस्सा सांगताना त्या गमतीने म्हणाल्या, ‘मी तीनवेळा पडले म्हणून सिनेमा हिट झाला’, हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला होता. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

36 मिनिटे ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

20 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago