मनोरंजन

रक्ताने पत्र लिहून त्याने केले होते तिला प्रपोज…

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. मात्र आमिर खानचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिले आहे. ह्या अभिनेत्याने दोन विवाह केले होते. १८ ऑगस्ट १९८६ रोजी त्यांचे पहिले लग्न
रीना दत्ताशी झाले होते. एक काळ असा होता जेव्हा दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे पण घटस्फोट घेतल्यानंतर दोघे वेगळे झाले आहेत.

आमिर खान आणि रीना दत्ता यांनी ८० च्या दशकात प्रेमविवाह केला होता. त्याचं लव्ह लाईफही खूप मजेदार होतं. आमिर खान आणि रीना दत्ता हे शेजारी असल्याचं बोललं जातं. दोघांचे घर आजूबाजूला होते आणि आमिर खान पहिल्याच नजरेत रीना दत्ताच्या प्रेमात पडला होता. आमिरनेही रीना दत्तावरील प्रेम एका अनोख्या पद्धतीने व्यक्त केले. त्याने रक्ताने प्रेमपत्र लिहून आपले प्रेम व्यक्त केले. मात्र, आमिरच्या या कृतीने रीना संतापली. पण हळूहळू रीनाही आमिरच्या प्रेमात पडली. यानंतर दोघांनी १८ एप्रिल १९८६ रोजी गुपचूप लग्न केले.

आमिर खान आणि रीना दत्ता यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. लग्नानंतर दोघेही इरा खान आणि जुनैद खान यांचे आई वडील झाले. दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी होते पण कालांतराने त्यांचे नाते बिघडू लागले. लग्नानंतर लगेचच आमिर खानचे इतर अभिनेत्रींसोबत लिंकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यामुळे आमिर आणि रीनाच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. या तणावामुळे आमिर आणि रीनाचे लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचले. २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आणि ते कायमचे वेगळे झाले.

मात्र घटस्फोटानंतरही आमिर आणि रीना भेटताना दिसत आहेत. ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. मैत्री आणि प्रेमाचे नाते निभावल्यानंतर आमिर आणि किरणने २००५ साली लग्न केले. यानंतर आमिर आणि किरण हे बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे बनले, पण २०२१ च्या सुरुवातीला आमिर आणि किरणचा घटस्फोटही झाला. दोघांना एक मुलगा आझाद आहे. घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण एकत्रच त्याची काळजी घेत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

5 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

6 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago