मुख्य बातम्या

अत्याधुनिक शेतीचा आदर्श नमुना; समाधान इचके यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार 2025′

शिरूर (अरुणकुमार मोटे): आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा 2025 पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्यात शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील तरुण प्रगतिशील शेतकरी समाधान श्रीरंग इचके यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश रामदास विटकर, रुद्रायणी अॅग्रो इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुहास बळी व कृषितज्ज्ञ अधिकारी एस. एस. सावंत यांच्या हस्ते इचकेंना प्रदान करण्यात आला.

समाधान इचके यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पॉलीहाऊस शेतीचा प्रारंभ केला. अत्याधुनिक पॉलीहाऊस शेड उभारून त्यांनी विदेशी फळे व पालेभाज्यांचे उत्पादन सुरू केले. त्यांचे पहिले व्यापारी पीक कलर कॅप्सिकम (शिमला मिरची) हे होते. या पिकासाठी त्यांनी जवळपास नऊ लाख रुपये गुंतवणूक केली होती.

अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत सुमारे १० टन शिमला मिरचीचे उत्पादन मिळाले. बाजारभाव चांगला मिळाल्याने केवळ दहा महिन्यांत सुमारे ११ लाख रुपये इतके उत्पन्न त्यांनी मिळवले. अत्याधुनिक शेतीतून मिळवलेले हे यश परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

पॉलीहाऊस शेती करताना उत्पादन व्यवस्थापन, खर्च नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि विक्रीपर्यंतची रणनीती या सर्व बाबतीत समाधान इचके यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. पंचायत समिती सदस्य सुदामभाऊ इचके, माजी सरपंच रामदास सांडभोर, फाकटे गावचे माजी सरपंच बारकु वाळुंज, वि.सो. संचालक कैलास बच्चे, दिनकर घोडे, भाऊसाहेब इचके, विजय इचके, राजेंद्र मुंजाळ, बबन हिलाळ, राहुल सांडभोर या सर्वांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यातून इचकेंची शेती अधिक बळकट झाली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कुशल वापर, मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर समाधान इचके यांनी शिरूर तालुक्याचा मान वाढवित आदर्श शेतकरी पुरस्कार 2025 पटकावला आहे. त्यांच्या कार्यामुळे प्रगतिशील शेतीचा नवा मार्ग तरुण शेतकऱ्यांसाठी खुला होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

13 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago