न्हावरे:- शिरुर तालुक्यातील मोटेवाडी येथे सुरु असलेल्या कामादरम्यान अचानक विद्युत शॉक लागून एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार, २७ डिसेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या मयत तरुणाचे नाव भरत महादेव उघडे (वय २९, सध्या रा. कात्रज, पुणे; मूळ रा. पाचवड, ता. परांडा, जि. धाराशिव) असे असुन तो मजुरीचे काम करत होता. मोटेवाडी (ता. शिरुर, जि. पुणे) येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास विजेचे काम सुरु असताना त्यांना अचानक जोराचा विद्युत शॉक बसला.
या घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने शिरुर येथील एका खाजगी हॉस्पिटमध्ये येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी मयताचा भाऊ बाबासाहेब महादेव उघडे (वय ३५, व्यवसाय मजुरी, सध्या रा. म्हैसगाव साखर कारखाना, माढा, जि. सोलापूर) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मोरे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…