मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील अण्णापूर येथे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विहीरीत पडून एक युवक ठार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर – मलठण रस्त्यावरील अण्णापूर येथे राहुल गोपीनाथ पठाडे रा. आसेगाव रस्ता, शेवगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर या युवकाचे त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची अल्टो केटेन गाडी नं. MH- १६ AT -१६६२ ही गाडी चालवत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी रस्त्याच्या खाली जावून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून गाडीसह बुडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, चालक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमाने यांनी धाव घेत परिसरातील नागरीकांच्या मदतीने गाडीसह त्याला बाहेर काढले. परंतू उशिरा मदत मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शीनी पाहिल्यानुसार हा युवक शिरुरकडून मलठणकडे आपल्या गाडीसह जात असताना तो पुन्हा येवले माथा येथून मागे वळून पुन्हा शिरुरकडे जात असताना उसाच्या ट्रक्टरला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी रस्ता सोडून पंधरा फुट लांब असणाऱ्या कठडा नसणाऱ्या विहीरीत गेली. व मोठी दुर्घटना घडली.

शिरुर तालुक्यात रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी कठडे नसलेल्या धोकादायक विहीरी असून त्यांना कठडा नसल्याने मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी विहीर मालकासह सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी; एकनाथ शिंदे

कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…

11 तास ago

पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन; सत्यजीत तांबे यांनी केला निर्णयाचे स्वागत

६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…

11 तास ago

घोडनदी बार असोसिएशनची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात; बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप

निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…

12 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे; सुनिल तटकरे यांच्याकडून नियुक्ती जाहीर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…

15 तास ago

म्हाडाच्या प्रलंबित प्रकल्पांना गती; मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…

15 तास ago

एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या महिला तलाठीवर पुन्हा लाचेचा गुन्हा; महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…

15 तास ago