मुख्य बातम्या

जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच; पाहा वैशिष्ट्ये…

मुंबईः जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 अखेर लाँच झाली. ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनावर धावेल. भारतीय दुचाकी कंपनी बजाजने हा चमत्कार घडवला आहे. बजाजने ते करुन दाखवले जे आतापर्यंत जगातील कोणत्याही कंपनीने केले नाही. दुचाकीच्या लाँचिंगवेळी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी ही बाईक गेमचेंजर ठरणार असल्याचे सांगितले. आकर्षक लूक, स्पोर्टी डिझाईच्या या बाईकची सुरुवातीची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरुम) आहे.

बजाज ऑटोने त्यांच्या या बाईकला कम्युटर सेग्मेंटमध्ये लाँच केले आहे. या बाईकच्या लूक आणि डिझाईनवर टीमने मेहनत घेतली आहे. पहिल्या नजरेतच तुम्हाला प्रश्न पडेल की सीएनजी सिलेंडर आहे तरी कुठे? ही बाईक पाहिल्यावर तुम्हाला अंदाज पण येणार नाही की, कंपनीने सीएनजी सिलेंडर कुठे ठेवले आहे ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पण या कमाल डिझाईनचे कौडकौतुक केले.

बजाज ऑटोने याविषयीचा खुलासा केला आहे. या बाईकला कंपनीच्या दाव्यानुसार, सर्वात लांब सीट (785MM) देण्यात आली आहे. फ्रंट फ्युअल टँक त्यात बरोबर बसते. सीएनजी टँक या सीट खाली आहे. यामध्ये हिरव्या रंगाचे सीएनजी तर नारिंगी रंगात पेट्रोल दाखविता येते. या बाईकमध्ये रोबस्ट ट्रेलिस फ्रेम देण्यात आली आहे. त्यामुळे ही बाईक वजनाला हलकी आणि मजबूत झाली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक बाजारातील मानांकनानुसार 11 विविध चाचण्या उत्तीर्ण झाली आहे. ही बाईक पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 मध्ये कंपनीिने 125 सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन बाईकला 9.5PS ची पॉवर आणि 9.7Nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये कंपनीने 2 लिटरचे पेट्रोल फ्युएल टँक आणि 2 किलोग्रॅमची सीएनजी टँक दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, बाईक फुल टँकमध्ये (पेट्रोल+सीएनजी) 300 किमीपर्यंतचे अंतर कापते.

ही बाईक तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. Bajaj Freedom 125 बाईक डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक या दोन ब्रेकिंग सिस्टिमसह येते. ही बाईक एकूण 7 रंगामध्ये येईल. यामध्ये कॅरेबियन ब्लू, इबोनी ब्लॅक ग्रे, प्यूटर ग्रे ब्लॅक, रेसिंड रेड, सायबर व्हाईट, प्यूटर ग्रे येलो, इबोनी ब्लॅक रेड रंगाचा यामध्ये समावेश आहे.

खळबळजनक! शिरूर तालुक्यात करंट देऊन पत्नीचा केला खून; कारण…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

शिरुर तालुक्यातील एका शासकीय पाझर तलावाला लागली भुक…हजारो ब्रास गौण खनिज केले गिळंकृत…

शिरुर तालुक्यात भाजपाची अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर; तालुक्यातील पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांची नाराजी…?

शिरुर तालुक्यात दोन शिक्षकांची शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास मारहाण; दोघांवरही निलंबनाची कारवाई

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago