मुख्य बातम्या

राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या दाजीच्या शेतमालाला आणि दुधाला बाजारभाव द्यावा; डॉ अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणुन महिला भगिनींना महिन्याला दिड हजार रुपये देण्याची घोषणा केली हि चांगली बाब आहे. परंतु त्याच बरोबर लाडक्या दाजींच्या दुधाला आणि शेतमालाला पण चांगला बाजारभाव द्यावा. तसेच ताई आणि दाजींच्या मुलांच्या शिक्षणासाठी सवलत द्यावी असा खोचक टोला डॉ अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारला लागवला.

 

लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल शिरुर शहरातील पंचायत वाडा याठिकाणी खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा आज (दि ६) रोजी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल तसेच आमदार अशोक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

पुढे बोलताना डॉ कोल्हे म्हणाले गुजरात मध्ये दुधाला ४० रुपये, केरळ मध्ये ४० रुपये तर कर्नाटक राज्यात दुधाला ३५ रुपये भाव आणि सरसकट ५ रुपये अनुदान आहे. मात्र महाराष्ट्रात मात्र दुधाला फक्त २५ ते २७ रुपये बाजारभाव आहे. तसेच या निवडणुकीत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक (उद्धव ठाकरे गट ), काँग्रेस आणि घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करुन मला निवडुन आणण्यासाठी कष्ट घेतले त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचेही यावेळेस कोल्हे म्हणाले.

 

यावेळी बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस स्वतःच्या प्रचारासोबत डॉ अमोल कोल्हे यांच्यावर इतरही आठ लोकसभा मतदार संघाच्या प्रचाराची जबाबदारी होती. त्यामुळे कोल्हे यांना तारेवरची कसरत करावी लागली. परंतु शिरुर तालुक्यातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झपाटल्यासारखं काम केलं. त्यामुळे डॉ कोल्हे यांना शिरुर तालुक्यात २८ हजार मतांची आघाडी मिळाली. तसेच ८५०० मत हि पिपाणी चिन्हाला मिळाली नाहीतर मतांची आघाडी अजुन वाढली असती.

 

उद्योगपती प्रकाश धारीवाल म्हणाले, आपल्या लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाच्या नावाच्या आधी ‘शिरुर’ हे नाव येत हे शिरुरच भाग्य आहे. माझे वडील उद्योजक रसिकलाल धारीवाल आणि रावसाहेब पवार यांचे घरगुती संबंध होते. आमदार अशोक पवार आणि माझेही घरगुती संबंध आहेत. तसेच माझा मुलगा आदित्य आणि अशोक पवारांचा मुलगा राज यांचेही घरगुती संबंध आहेत. आमच्या शिरुर शहरात अनेक बांधव झोपडीत राहतात. त्यांना पक्की घरे मिळावीत यासाठी डॉ कोल्हे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी धारिवाल यांनी केली.

 

यावेळी विश्वास ढमढेरे, बाळासाहेब नरके, पांडुरंग थोरात, मुज्जफर कुरेशी, शेखर पाचुंदकर, स्वप्निल गायकवाड, संजय देशमुख, सुजाता पवार, कामिनी बाफना, धरमचंद फुलफगर, संतोष भंडारी, चंद्रकांत बोरा, सुरेश पाचर्णे, निलेश खाबिया, संगिता शेवाळे, विद्या भुजबळ, स्मिता कवाद, राणी कर्डीले, गिता आढाव व अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक संजय देशमुख तर सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले.

खळबळजनक! शिरुर शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

शिरुर तालुक्यात भाजपाची अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर; तालुक्यातील पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांची नाराजी…?

शिरुर तालुक्यातील एका शासकीय पाझर तलावाला लागली भुक ;हजारो ब्रास गौण खनिज केले गिळंकृत

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दीपके राष्ट्रीय संयोजक, सौरव दास-आशुतोष रांका सहसंयोजक

मुंबई : CJP (कॉकरोच जनता पार्टी) ने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक…

11 मिनिटे ago

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

14 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

14 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

18 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

18 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

18 तास ago