मुख्य बातम्या

कारेगावमध्ये गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कारेगाव गावातील टपऱ्यांवर छापा टाकून पोलीसांनी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पंडीत शंकरराव मुंडे (वय ४२) यांनी फिर्याद दिली असुन महेश मच्छिंद्र जाधव (वय ३२) तसेच राकेश राजु गुप्ता (वय ३०) दोघेही रा. बाभुळसर रोड, कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) अशी कारवाई झालेल्या दोघांची नावे असुन दि ८जून २०२५ रोजी सायंकाळी ६:४५ च्या दरम्यान कारेगावच्या हद्दीत “कारेश्वर जनरल स्टोअर्स” व “बालाजी पान शॉप” या दोन टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाई दरम्यान पोलिसांना विविध प्रकारचे विमल, सम्राट, गोवा १०००, राजश्री, रजनीगंधा व प्रिमियम राजश्री पान मसाला यांचे सुटे व पॅकबंद पुडे सापडले. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ५३९९ इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही आरोपींकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवलेला आढळून आल्याने त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार अभिमान कोळेकर करीत आहेत.

करडे-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, चालक फरार

रांजणगाव तिहेरी हत्याकांड; लव्ह, सेक्स आणि धोका…?

शिरुर मध्ये सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्यासह कार्यकर्त्यांचे सामुहिक मुंडण

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

2 तास ago

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

15 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

15 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

15 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

15 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

21 तास ago