शिंदोडी (तेजस फडके) करडे-न्हावरे रस्त्यावर दि ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बाळासाहेब रंगनाथ थोरात (वय५३, रा. निमोणे, ता. शिरुर, जि.पुणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन अपघातानंतर संबंधित वाहनाचा चालक घटनास्थळावरुन वाहनासह फरार झाला असुन या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बाळासाहेब थोरात यांचा मुलगा शुभम बाळासाहेब थोरात (वय २८) रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अपघाताच्या दिवशी वडील बाळासाहेब थोरात हे एम एच १२ एन एन ३६०२ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन करडे गावातील चौकातुन न्हावरे रोडने घरी येत असताना समोरुन आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांच्या डोक्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर अज्ञात चालकाने थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरुन पळ काढला.
या अपघातात बाळासाहेब थोरात यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. धडक दिलेल्या अज्ञात वाहनचालकाने मदत न करता घटनास्थळावरुन वाहन घेऊन पळ काढल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शिरुर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार पवार हे करत आहेत.करडे येथील स्थानिक नागरिकांनी अपघाताबाबत कोणतीही माहिती असल्यास शिरुर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…