मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील बापलेकाचा विहिरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू

शिरूर दि.०५ ( अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील साबळेवाडी येथे शुक्रवारी (दि. ५) सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत बापलेकाचा विहीरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांमध्ये सुदाम सुभाष गाढवे (वय ४३) व त्यांचा मुलगा भारत सुदाम गाढवे (वय १७) यांचा समावेश आहे. सुदाम गाढवे हे सकाळी विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. बराच वेळ लोटला तरी ते परत न आल्याने मुलगा भारत त्यांना पाहण्यासाठी विहिरीकडे गेला. त्याने वडिलांना पाण्यात पडलेले पाहून त्यांना वाचविण्यासाठी मित्राला हाक देत विहिरीत उडी घेतली, मात्र त्यालाही विजेचा जबर धक्का बसला. पाण्यात विजेचा करंट उतरल्याने दोघांनाही जीव गमवावा लागला.

भारतच्या मित्राने बाजूच्या लोकांना बोलावून घेतले. ग्रामस्थांनी वीजप्रवाह बंद करून बापलेकाला विहिरीतून बाहेर काढून तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

सुदाम गाढवे हे वारकरी संप्रदायातील भक्तीमय कार्यात अग्रेसर होते. ते टाकळीकर प्रासादिक दिंडीसोबत दरवर्षी देहूपासून पंढरपूर वारीत सहभागी होत असत. भजनी मालिकेचे त्यांना विशेष ज्ञान होते. मुलगा भारत हा बापूसाहेब गावडे विद्यालय, टाकळी हाजी येथे अकरावीचा विद्यार्थी होता.

गाढवे कुटुंब नगर जिल्ह्यातील नांदूर पठारचे मूळ रहिवासी असून टाकळी हाजी येथे ते स्थायिक झाले होते. त्यांनी दूध व्यवसाय उभारला होता. सध्या त्यांच्या कुटुंबाकडे दहा ते पंधरा जर्सी गाई असून दररोज शंभर लिटर दूध डेअरीला पुरविले जात होते. बापलेकाच्या अकाली निधनाने गाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago