श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबधित व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात सोमवार (दि २३) रोजी रात्री उशिरा बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील फिर्यादी संदीप गुलाब खेडकर (वय ३२) रा. म्हसे, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर हे (दि २२) रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास म्हसे ते पिंप्री कोलंदर रस्त्यावर दुचाकीवरुन जात असताना आरोपी यांनी त्यांची चारचाकी गाडी व बुलेट फिर्यादीच्या दुचाकीला आडवी लाऊन बेकायदेशीर जमाव जमवत फिर्यादीस पिस्टलचा धाक दाखवुन कोयत्याने वार करुन दुखापत केली व फिर्यादीच्या खिशातील ३० हजार रुपये रोख रक्कम काढुन घेतली.
त्यामुळे संदीप खेडकर यांच्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलिस स्टेशन येथे गणेश रामभाऊ दिवेकर, दादा मोहरे, विशाल लक्ष्मण देवीकर, अवी जर्जोळ, विजय भाऊसो देवीकर तसेच एक अनोळखी इसम सर्व (रा. म्हसे, ता. श्रीगोंदा, जि अहिल्यानगर) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मारुती कोळपे हे करत आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात वाळुमाफियावर हल्ला; वाळु माफिया गंभीर जखमी
शिरुर तालुक्यात अवैध वाळु उपशामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता…?
शिरुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट…?
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…