मुख्य बातम्या

शिक्रापुरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; ८० हजारांचा ऐवज लंपास

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होत असून, पाबळ फाटा येथील सिद्धी अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करुन तब्बल ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी भोपेंद्रसिंग सुदामसिंग पाटील (वय ३२) रा. रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट, पाबळफाटा, शिक्रापुर, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन अज्ञात इसमाविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ११ मे २०२६ रोजी सकाळी ६ ते दुपारी ३:२० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटे फोडून मौल्यवान वस्तूंवर हात साफ करण्यात आला.

या अज्ञात चोरट्यानी घरातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शिक्रापुर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

शिक्रापुर परिसरात दिवसाढवळ्या बंद घरांवर पाळत ठेवून चोरट्यांकडून गुन्हे घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.शिक्रापुर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भालेराव हे करत आहेत. 

शिरुर तालुक्यात हॉटेल समोरच तरुणावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (घोडनदी) न्यायालयाचा धनादेश अनादर प्रकरणी दोषी आरोपीला दणका

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

7 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

9 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

9 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

9 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

9 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

9 तास ago