मुख्य बातम्या

मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींची मालमत्ता जप्त…

पुणेः पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत खेमदारे आणि सतीश यादव यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर येथील 85 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप मंगलदास बांदल यांच्यावर आहे. याआधी याच गुन्ह्यात अनिल भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

मनी लॉड्रिंग प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने 21 ऑगस्ट रोजी छापे टाकले होते. त्यावेळी बांदल याना अटक केली होती. मंगलदास बांदल यांची पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात असलेली मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती. ईडीकडून बांदल यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त केली. बांदल यांच्या बँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. मंगलदास बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत खेमदारे आणि सतीश यादव यांची यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. अनिल भोसले यांच्याविरोधात दाखल होता गुन्हा त्याच गुन्ह्यात ईडीची कारवाई करण्यात आली आहे. मंगलदास बांदल यांनी कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनिल भोसले यांच्याविरोधात यापूर्वी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल या शिरूर-हवेलीमधून तयारी करीत असतानाच बांदल यांच्यावर ‘ईडी’ची छापेमारी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

मंगलदास बांदल यांच्या पत्नी आणि भावालाही ईडीने चौकशीला बोलावलं; ईडीच्या कोठडीत अजुन आठ दिवस बांदलाचा मुक्काम

मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड

मंगलदास बांदल यांना ईडीने केली अटक; कोट्यवधींचं घबाड

मंगलदास बांदल यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

19 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

20 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago