रांजणगाव गणपती (तेजस फडके) पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथे थेट विद्युत वाहिनीवर चढून अज्ञात व्यक्तीने मुसळधार पाऊसात बेकायदेशीररीत्या जाहिरातीचे फलक लावल्याचा धक्कादायक प्रकार ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने उघडकीस आणला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) रांजणगाव पोलिसांकडे पत्र देत संबधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे.
पिंपरी दुमाला येथे दि २२ सप्टेंबर २०२५ रोजी मुसळधार पाऊस चालु असताना विजेच्या खांबावर जाहिरातीचा फलक लावण्यात आल्याचे वृत्त ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. सदर जाहिरात फलक बसवण्यासाठी महावितरणकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली हि बाब तपासात उघड झाली. प्रत्यक्षात अशा परवानग्या महावितरण कधीच देत नाही.
रांजणगाव महावितरणचे शाखा अभियंता दिपक पंढरीनाथ पाचुंदकर यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना याबाबत पत्र दिले आहे. त्यात “हा प्रकार केवळ बेकायदेशीरच नाही तर अत्यंत जीवघेणा आहे. वीज वाहिनीवर जाहिरात फलक बसवणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण. त्यामुळे संबंधित अज्ञात व्यक्ती किंवा जाहिरात एजन्सीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी.” असे नमुद केले आहे.
तसेच या पत्राची प्रत महावितरणचे केडगाव येथील कार्यकारी अभियंता आणि शिक्रापुर येथील उपकार्यकारी अभियंता यांनाही देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता रांजणगाव पोलिसांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?
रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद
रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…