कारेगावात “शिवतीर्थ प्रतिष्ठान” तर्फे भव्य सार्वजनिक नवरात्रोत्सव

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२५’ यंदा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. “शिवतीर्थ प्रतिष्ठान” आयोजित या उत्सवाची सुरुवात सोमवार दि २२ सप्टेंबर २०२५ रोजी झाला असुन संपूर्ण आठवडाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी ग्रामस्थांना अनुभवायला मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करुन झाली. मंगळवार (दि २३) रोजी ग्रामस्थांच्या हस्ते गौरी पुजन कार्यक्रम संपन्न झाला. तिसऱ्या दिवशी बुधवार (दि २४) रोजी प्रसिद्ध गायक आकाश शिंदे यांचा स्वरमंची हा कार्यक्रम झाला.

त्याचबरोबर गुरुवार (दि २५) रोजी जादूगार ईश्वर यांचे जादूच्या प्रयोगाने लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांना थक्क केले. तर शुक्रवार (दि २६) फुल धमाल विनोदी भटकंती हा कार्यक्रम तर शनिवार (दि २७) लोकप्रिय विनोदी कलाकार अ‍ॅड सुभाष यादव यांचा कॉमेडी तडका रंगणार असून महिलांसाठी खास मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार (दि २८) लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, तर सोमवारी भव्य दांडिया महोत्सव रंगणार आहे. शेवटच्या दोन दिवसांतही दांडिया महोत्सवाचे आयोजन होणार असून मंगळवार (दि ३०) सप्टेंबर रोजी उत्सवाचा समारोप केला जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी बुधवार दि १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. देवीची भव्य मिरवणूक व आरती सोहळा पार पडणार आहे.

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद

रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका