मुख्य बातम्या

शिरुरमध्ये महिलांसाठी डिजिटल आर्थिक साक्षरता मास्टर ट्रेनर प्रशिक्षण; ३० महिला बनल्या “ई-दोस्त”

शिरुर (तेजस फडके) ग्रामीण भागातील महिलांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करून आर्थिक स्वावलंबनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘आयटीसी मिशन सुनहरा कल आणि बायफ संस्था पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर येथे “डिजिटल आर्थिक साक्षरता मास्टर ट्रेनर प्रशिक्षण” यशस्वीपणे पार पडले. या प्रशिक्षणात विविध गावांमधील तब्बल ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

त्यामुळे शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांच्या हातात डिजिटल तंत्रज्ञान येऊन आर्थिक स्वावलंबनाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांना ‘ई दोस्त’ कार्यक्रमाबद्दल बायफ संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक पुजा माजगणकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ‘ई दोस्त’ हा उपक्रम महिलांना डिजिटल सेवा पुरवणारे “डिजिटल दूत” बणवुन ग्रामीण भागात तंत्रज्ञान सुलभ करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे.

दरम्यान, Department of Science and Technology (DOST) तर्फे महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ACCORD (कृत्रिम बुद्धिमत्ता), ASCENT (स्वयंचलित प्रणाली), CONNECT (नेटवर्क) आणि THRIVE (संशोधन) अशा अत्याधुनिक योजनांची २०२५ मध्ये सुरुवात करण्यात आली आहे. या योजनांचा उद्देश महिलांना तंत्रज्ञानाशी जोडून आत्मनिर्भरतेकडे नेणे हा आहे.

या कार्यक्रमासाठी सुहास गवांदे, गणेश शेवाळे, कृषी सहाय्यक ज्योती भिटे, गजानन पाटील, किरण सालके, आयटीसी अधिकारी सायली कदम व नियर बाय कंपनीचे सचिन धुमाळ उपस्थित होते. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कसा क्रांतिकारी ठरु शकतो याबाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात महिलांना डिजिटल आर्थिक व्यवहार, तिकीट बुकिंग, लोन सुविधा, मायक्रो एटीएम, क्यूआर कोड, यूपीआय व्यवहार, पेमेंट यंत्रणा आदी डिजिटल कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

शिरुर; विद्युत वाहिनीवर बेकायदेशीर जाहिरात फलक; महावितरणची पोलिसांकडे तक्रार

Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?

शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

19 तास ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

1 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

1 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

1 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

1 दिवस ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

2 दिवस ago