मुख्य बातम्या

शिरूरमध्ये कृषी सेवा केंद्रात कोयता व कात्रीने दहशत; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील विशाल कृषी सेवा केंद्रात कोयता व कात्री घेऊन तिघांनी दहशत माजवत एका व्यक्तीवर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “आमच्याविरोधात तहसील कार्यालयात तक्रार करतोस का?” असे म्हणत तिघांनी एकावर हल्ला केला असून, याप्रकरणी तिघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात संतोष बाळू पाचर्णे (वय ४२) व्यवसाय मजुरी, रा. जांभळी मळा, तरडोबाची वाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीवरून परवेश उर्फ पाप्या पठाण (पूर्ण नाव माहिती नाही), रुपेश चित्ते (पूर्ण नाव माहिती नाही) आणि ओंकार दत्तात्रय जाधव (सर्व रा. तरडोबाची वाडी, ता. शिरूर, जि. पुणे) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. ५) एप्रिल २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास विशाल कृषी सेवा केंद्रात फिर्यादी संतोष पाचर्णे व मालक शिवम शिंदे काम करत असताना, वरील तिघे आरोपी दुकानात आले. त्यावेळी ओंकार जाधव यांनी “तुला लय मस्ती आली का? आमची तक्रार तहसील ऑफिसला करतोस काय? आता दाखवतोच तुला…” असे म्हणत दमदाटी केली. त्यानंतर पाप्या पठाण याने फिर्यादीला हाताने तसेच कात्रीने उजव्या हातावर व पायावर मारहाण केली.

रुपेश चित्ते याने कोयता फिरवत परिसरातील दुकानदारांमध्ये दहशत निर्माण केली, त्यामुळे दुकाने बंद करण्यात आली व लोकांनी पळ काढला. त्यानंतर दुकानात येऊन फिर्यादीच्या डोक्यामागील बाजूस वार करण्यात आला. शिवम शिंदे व फिर्यादी यांनी आरडाओरड करताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.या घटनेप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार साबळे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

5 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

5 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

6 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

6 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

6 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

9 तास ago