पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटेच अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात जाऊन कामांची पाहणी केली. दुसरीकडे अमोल कोल्हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
अजित पवार यांच्याकडून सोमवारी (ता. २५) अमोल कोल्हे यांना खुलं चॅलेंज देण्यात आले होते. शिरूर लोकसभा जिंकून दाखवू असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आज (मंगळवार) अजित पवार पहाटेच अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत. लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांची पाहाणी अजित पवार यांच्याकडून करण्यात आली. यावेळी त्यांनी मांजरीमधील पाणीपुरवठा योजना, माजंरी रेल्वे गेट उड्डाणपूल आणि मुळा-मुठा नदीवरील पुलाची पाहाणी केली.
दरम्यान. आजचा दौरा हा पूर्वनियोजित होता, काल दिलेल्या आव्हानाचा आणि आजच्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. शिरूर लोकसभा जिंकून दाखवू हे काल फायनल ठरलं आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, एका खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी केले. आता त्यांना आंदोलन सुचत आहेत. पण, त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते इतकंच नाही तर दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे बोलत होते. गेल्या पाच वर्षांत यांची भूमिका काय होती आणि गेल्या काळात तुम्ही कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघात पाहिले, असा टोला अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना सोमवारी लगावला होता.
अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध शिरुरमधून अजितदादांकडून तगडा उमेदवार तयार…
अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…
शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची राष्ट्रवादीकडून घोषणा…
शिरुर विधानसभेचा भाजपाचा उमेदवार कोण?
राष्ट्रवादी! बापाशी कृतघ्न होवून गद्दारी करायची आमची सवय नाही…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…