क्राईम

अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; विद्यार्थी जखमी…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात राहुरीकडून संगमनेरकडे जाणारी एसटी बसला अपघात होऊन ती पलटी झाली. या बसमधून मोठ्या संख्येने शाळेत आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी प्रवास करत होते. अपघातामध्ये विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. एसटी बस राहुरीहून आश्वी शिबलापूर मार्गे संगमनेरकडे निघाली होती. मात्र पिंपरणे गावात पोहोचल्यानंतर बसचा रॉड तुटला. बसचा रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

या बसमध्ये साधारण चाळीस विद्यार्थ्यांसह काही नागरीक प्रवास करत होते, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामध्ये काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

भीषण अपघात! शिरूर तालुक्यात एसटीच्या चाकाखाली घुसली दुचाकी…

कोरेगाव भीमा येथे विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; रस्त्यावर रक्ताचा सडा…

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

13 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago