amol-kolhe-kawthe-yemai

राष्ट्रवादी! बापाशी कृतघ्न होवून गद्दारी करायची आमची सवय नाही…

राजकीय शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील ४२ गावांमधील निष्ठावंत आक्रमक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शिरूर तालुक्यातील ४२ गावांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता. १९) कवठे येमाई येथे संपन्न झाला. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

शेतमालाचे बाजारभाव पडल्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा, टोमॅटो, दूध, भाजीपाल्याचे कोट्यावधींचे नुकसान झाले असून यास येथील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. आम्ही कोणत्याही गटाचे नाही, आम्ही मुळ राष्ट्रवादी पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून जे बाजूला गेले त्यास गट म्हणा आणि जे शरद पवार यांचे बरोबर आहेत ते मुळ पक्षाचे आहेत, अशी टीका निकम यांनी केली.

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, निवृत सीईओ प्रभाकर गावडे, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्या अरुणा घोडे, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, बन्सीशेठ घोडे, मल्हारी काळे, नाना फुलसुंदर, बाळासाहेब डांगे, शरद बोंबे तसेच शिरूर-आंबेगाव मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शिरूरच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची उघड एन्ट्री…
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शिरूरमधील ४२ गावांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याने बहुतांशी नेते उघडपणे स्पष्ट भूमिका जाहीर करत नव्हते. मात्र या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक गावांतील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही, आजवरच्या विकासाचे शिल्पकार शरद पवार हेच आहेत, याचे श्रेय कुणी घेऊ नये असा टोला लगावत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

शरद पवार यांना सोडून गेलेल्या नेत्यांसाठी १९४२ ला ब्रिटिशांविरुद्ध चले जाव ची चळवळ सुरू झाली याची आठवण करून देत ४२ गावांतील लोकांनी गद्दार राज्यकर्त्यांना चले जाव चा नारा द्या असे आवाहन जगन्नाथ शेवाळे यांनी केले. पक्षातील प्रमुख नऊ मंत्र्यांबद्दल नवग्रहाची उपमा देत त्यांच्या प्रमुखासोबत या दहतोंडी रावणाचे दहन करण्याची वेळ आल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

अमोल कोल्हे यांनी बोलताना देशात शिरूर मतदार संघातील कामांच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो. संसदरत्न पुरस्काराचे खरे मानकरी मतदार संघातील मायबाप जनता आहे. प्रेमाने काहीही ऐकू पण जर बोट दाखविले तर हात काढून हातात देण्याचे पाऊल उचलावे लागेल असे सांगितले. पक्ष फुटी बाबत बोलताना पहिल्या दिवशी चूक झाली, माहित नव्हते फक्त नेत्याने बोलवले म्हणून आदेशाचे पालन केले. मी त्यांना नेता मानतो म्हणून तिथे गेलो. मात्र तिथे काही वेगळेच झाले. बापाशी कृतघ्न होवून गद्दारी करायची आमची सवय नाही, असेही ते म्हणाले.

शिरुर तालुक्यातील स्वप्नील गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड

शिरुर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी निलेश चव्हाण यांची निवड

शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची राष्ट्रवादीकडून घोषणा…

राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक कार्यकर्ते व पदाधिकारी शरद पवार साहेबांसोबत

राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ साजरा; आंदोलन करत गद्दारांचा केला निषेध…